इंदोरीकर महाराज
इंदोरीकर महाराज
सार्वमत

पुढील सुनावणी आता 16 सप्टेंबर रोजी !

प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली होती

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamaner

प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

इंदोरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने खालील कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली होती. दरम्यान आज जिल्हा सत्र न्यायालयात सदर खटल्यावर सुनावणी झाली. सरकारी पक्ष्याच्या वतीने सरकारी वकील बी.जी.कोल्हे हजर झाले. त्यांनी सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. यावर मा. न्यायालयाने त्यांना 16 सप्टेंबर 2020 पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. तसेच या खटल्यात साक्षीदार असलेल्या रंजना गवांदे यांनी अर्ज दिला आहे की, आम्हाला या खटल्यात बाजू मांडण्याची संधी द्यावी .

आता पुढील सुनावणी दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. साक्षीदार यांनी सदर खटल्या संदर्भात दिलेल्या अर्जावर इंदोरीकर महाराजांच्या वतीने हरकत घेणार आहोत, अशी माहिती इंदोरीकर महाराज यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com