इंदोरीकर महाराजांना जीवन गौरव पुरस्कार

इंदोरीकर महाराजांना जीवन गौरव पुरस्कार

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील उंचखडक येथील श्री सद्गुरू यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने वारकरी सांप्रदायात उल्लेखनीय काम करणार्‍यांना देण्यात येणारा श्री सद्गुरू यशवंतबाबा वारकरी जीवन गौरव पुरस्कार अकोले तालुक्याचे सुपूत्र, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना आ. डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व गोऋषी ओम भारतीजी महाराज यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला.

श्रीक्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक येथे श्री सद्गुरू यशवंतबाबा यांचा अमृतमहोत्सवी (75वी) पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सप्ताह सोहळा मार्गदर्शक योगी केशवबाबा चौधरी, मनोहरबाबा भोर, निवृत्ती महाराज देशमुख, विठ्ठलपंत महाराज, दीपक महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सोहळ्यासाठी अकोले तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी देशमुख महाराजांनी श्रीक्षेत्र राममाळ येथील जुन्या आठवणींना उजाळा दिला.प्रास्ताविक देवस्थानचे उपाध्यक्ष अशोकराव देशमुख यांनी केले. येणार्‍या वर्षात श्रीक्षेत्र राममाळ येथे भव्यदिव्य असे राममंदिराच्या कामाला सुरूवात करणार असल्याचे म्हटले. आ. लहामटे यांनी देखील या कामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष, शिवव्याख्याते प्रा.एस.झेड.देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष दशरथराव सावंत, उपाध्यक्ष अशोकराव देशमुख, सेक्रेटरी योगी केशवबाबा चौधरी, विश्वस्त प्रतापराव देशमुख, तुकाराम बाबा देशमुख, हिंमत मोहिते, भाऊसाहेब खरात, दिलीपराव मंडलिक, देवराम शिंदे, भरत देशमुख, बेलदार समाज, ग्रामस्थ उपस्थित होते.

सूत्रसंचालन उंचखडकचे उपसरपंच व बुवासहेब नवले मल्टीस्टेटचे संचालक महिपाल देशमुख यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com