अहमदनगर (प्रतिनिधी) -

लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आलेले सर्व होर्डिंग्ज जिल्हाधिकारी

डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर हटविण्यात आले. या मागणीसाठी शहर काँग्रेसने आंदोलन उभे केले होते.

31 डिसेंबरला विद्यार्थी काँग्रेसने या मागणीबाबत मनपा उपायुक्तांना निवेदन दिले होते. त्यावर कारवाई न झाल्यामुळे 7 जानेवारीला मनपामध्ये झालेल्या आंदोलनात जिजाऊ जयंतीदिनी 12 जानेवारीला बुलडोजरने होर्डिंग्ज हटविण्याची घोषणा केली होती. पुतळ्याचे पावित्र्य राखत पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची देखील मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस पक्षाच्या या आक्रमक घोषणेमुळे शहरात तणाव निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यापूर्वीच जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यामुळे मनपाने कारवाई करत सर्व होर्डिंग्ज उतरवले. त्याचबरोबर नेहरू पुतळा परिसराला लागून असणारी अतिक्रमणे देखील हटविली.

सोमवार सकाळपासून महापालिकेच्या साफ सफाई कर्मचार्यांनी परिसर स्वच्छतेसाठी धावाधाव केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला खलील सय्यद, मनोज गुंदेचा, नलिनीताई गायकवाड, अनंतराव गारदे, फारुखभाई शेख, अनिसभाई चुडीवाल, नाथा अल्हाट, निजामभाई जहागीरदार, चिरंजीव गाढवे, अॅड. अक्षय कुलट, नीता बर्वे, कौसर खान, प्रमोद अबुज, अमित भांड, प्रवीण गीते, सिद्धेश्वर झेंडे, सुजित जगताप, अज्जूभाई शेख, प्रसाद शिंदे, प्रशांत वाघ, शरीफ सय्यद, मुबीन शेख, वाजिद शेख, अॅड.चेतन रोहोकले आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.