देशात 3 कोटी टन साखर उत्पादन होणार

देशात 3 कोटी टन साखर उत्पादन होणार

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जून 2021 च्या अखेरच्या आठवड्यात करण्यात आलेल्या सॅटेलाईट मॅपिंगच्या पहिल्या सर्वेक्षणाच्या आधारावर 2021-22 या हंगामासाठी 310 लाख टन साखर उत्पादनाचे प्रारंभिक अनुमान जारी केले होते. हे अनुमान इथेनॉल उत्पादनासाठी 34 लाख टन साखर संभाव्य डायव्हर्जन लक्षात ठेवून हे अनुमान जारी करण्यात आले होते. आपल्या नव्या अनुमानात इस्माने 2021-22 या हंगामात 305 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

इस्माने सांगितले की, देशभरात ऊसाच्या पिकाच्या लागवडीची उपग्रहाद्वारे दुसरी छायाचित्रे ऑक्टोबर 2021 च्या दुसर्‍या आठवड्यात घेण्यात आली आहेत. उपग्रहांच्या छायाचित्रांच्या आधारावर 2021-22 या हंगामात उसाच्या एकूण लागवड क्षेत्र 54.37 लाख हेक्टर असण्याची शक्यता आहे. 2020-21 या हंगामातील 52.88 लाख हेक्टर ऊस क्षेत्राच्या तुलनेत ते 3 टक्क्यांनी अधिक आहे. 28 ऑक्टोबर 2021 रोजी इस्माच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील उसाचे क्षेत्रफळ 23.08 लाख हेक्टर असेल असा अंदाज आहे. उत्पादीत साखर उत्पादन, 2021-22 मध्ये इथेनॉल उत्पादनावर आधारित 113.5 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र 11.48 लाख हेक्टर टनावरून वाढून 2021-22 मध्ये 12.78 लाख हेक्टर झाले आहे. महाराष्ट्रात 2021-22 या हंगामात साखर उत्पादन 122.5 लाख टन होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात 2021-22 या हंगामात साखर उत्पादन 49.5 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. उर्वरीत राज्यांत 2021-22 या हंगामात सामूहिक रुपाने 53.10 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

साखरेचा रस, सिरप आणि बी मोलॅसीसच्या महत्त्वपूर्ण उत्पादनाला इथेनॉल उत्पादनात बदलण्यात आले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात जवळपास 34 लाख टनाची घट होईल. त्यामुळे उसाचा रस, बी शिरा याला इथेनॉलमध्ये रुपांतरीत होत असल्याने इस्माने 2021-22 मध्ये 305 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com