भारताच्या बॅडमिंटनपटूंनी थॉमस कप जिंकुन जागतिक स्तरावर नावलौकीक मिळवला - विवेक कोल्हे

भारताच्या बॅडमिंटनपटूंनी थॉमस कप जिंकुन जागतिक स्तरावर नावलौकीक मिळवला - विवेक कोल्हे
विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

चौदावेळा जागतिक स्तरावर जिंकलेल्या इंडोनेशिया संघाचा (Union of Indonesia) भारतीय बॅडमिंटनपटूंनी (Indian Badminton Players) अलौकीक खेळ (Sport) करत आपल्या देशाला ऐतिहासिक थॉमस कप (Thomas Cup) जिंकुन देत जागतिक स्तरावर लौकीकास्पद कामगिरी केल्याबद्दल जिल्हा बँकचे संचालक विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी बॅडमिंटनपटूंचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खेलो इंडिया या मोहिमेला दिलेल्या पाठबळामुळेच ऐतिहासिक कामगिरी आपल्या खेळाडूंनी करून दाखवली आहे. थॉमस कप भारताला पहिल्यांदाच मिळाला. यात युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, लक्ष्य सेन, एचड प्रण्णाव, किदंबी श्रीकांत, सात्वीक साईराज रानीकी रेड्डी यांनी उत्तम कामगिरी करत इंडोनेशिया संघाला बँकॉक थायलंड येथे 3_00 ने पराभव केला. इंडोनेशिया (Indonesia), चायना (China), मलेशिया (Malaysia), जपान ( Japan) आणि डेन्मार्क (Denmark) या पाच देशांचे वर्चस्व या थॉमस कप (Thomas Cup) वर होतं त्यावर भारतीय संघाने (Indian Team) आपले नाव कोरले आहे, हा मोठा योगायोग आहे.

भारत देशाने आजवर विविध खेळात राज्य, देश तसेच ऑलींम्पीक स्पर्धेत गुणात्मक कामगिरी करून असंख्य पारितोषके मिळवून दिली. भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळात सर्वाधीक शतके करून विक्रम केला. त्याचबरोबर क्रिकेटचा विश्वकपही जिंकला. भारताचे बॅडमिंटनपटू युवा खेळाडू यांना प्रशिक्षण देणारे त्यांचे प्रशिक्षक यांचा हा मोठ सन्मान आहे. सलग चौदावेळा थॉमस कप जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला हरवणे सोपे नव्हते. खेळात सातत्य, जिद्द, महत्वकांक्षा असली की, यश चालून येते. भारतीय संघाला थॉमस कप मिळाला ही बाब जागतिक स्तरावर कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com