स्वातंत्र्य दिनी भंडारदरा व परिसर 'हाऊसफुल्ल'! वाहनांच्या लांबच लांब रांगा

स्वातंत्र्य दिनी भंडारदरा व परिसर 'हाऊसफुल्ल'! वाहनांच्या लांबच लांब रांगा
Photo : Vilas Tupe

अकोले |प्रतिनिधी| Akole

आज स्वातंत्र्य दिन (Independence Day) व उद्या पारशी नववर्षानिमित्तची सुट्टी जोडून आल्यामुळे निसर्गाचे लेणे समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) व परिसरात हजारो पर्यटकांनी (Tourists) हजेरी लावली आहे. भंडारदरा या परिसरातील रस्ते गर्दीने ओसंडून वाहत आहे.

भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस प्रशासनाने संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर उद्या सायंकाळी ८ वाजेपर्यंत एकेरी वाहतूक नियमन केल्याने पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटनस्थळी अशीचं परिस्थिती आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात उंच असणार्‍या कळसूबाई शिखरावरही (The highest peak in Maharashtra is Kalsubai) पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

Photo : Vilas Tupe
Photo : Vilas Tupe

१५ ऑगस्टच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अकोले तालुक्यात (Akole Taluka) पुणे, नाशिक, ठाणे मुंबई आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी येत असतात. भंडारदरा धरण (Bhandardara Dam), रंधा धबधबा (Randha Falls), कोकणकडा (Kokankada), हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), कळसुबाई शिखर (Kalsubai peak), अमृतेश्वर मंदीर रतनवाडी (Amruteshwar Temple Ratanwadi), सांदनदरी या प्रेक्षणीय स्थळी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com