जिल्ह्यात वाढती करोना रूग्णसंख्या; पालकमंत्र्यांनी घेतला 'हा' निर्णय

जिल्ह्यात वाढती करोना रूग्णसंख्या; पालकमंत्र्यांनी घेतला 'हा' निर्णय

अहमदनगर|Ahmedagar

जिल्ह्याचा करोना पॉझिटिव्हिटी रेट (Corona positivity rate) कमी आहे. परंतु चाचण्यांचे प्रमाण (Corona test) वाढविल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. जास्तीत जास्त चाचण्या करणं चांगलं आहे. त्यामुळे जीवाला धोका कमी होतो....

जिल्ह्यात वाढती करोना रूग्णसंख्या; पालकमंत्र्यांनी घेतला 'हा' निर्णय
Corona Update : जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्णसंख्येत किंचित घट; वाचा, ताजी आकडेवारी

मृत्यूचे प्रमाण वाढत नाही. तरीपण जिल्ह्यात वाढत्या करोनाच्या संदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्स (Task Force) समितीचे सदस्य डॉ. दीपक म्हैसकर (Dr Dipak Mhaiskar) यांच्या सोबत चर्चा केली असून ते स्वतः जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी दिली. मंत्री मुश्रीफ दोन दिवसापासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, करोना लसीचे (COVID19 Vaccine) दोन डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेऊन १४ दिवस पुर्ण झालेल्यांसाठी पास देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. सध्या सणावारांचे दिवस असल्यामुळे धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार नाही. त्यातून संक्रमण वाढेल व बाधितांची संख्या वाढेल. परंतु भविष्यात दोन डोस घेतल्यांसाठी धार्मिक स्थळी प्रवेश दिला जाऊ शकतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com