पोळा सणानिमित्त मातीच्या बैलांना वाढती मागणी
सार्वमत

पोळा सणानिमित्त मातीच्या बैलांना वाढती मागणी

आज बैल पोळा सण असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पूजेला अनन्य साधारण महत्व आहे.

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

बैल पोळा सणानिमित्त मातीच्या बैलांची मागणीत वाढ झाली. आज बैल पोळा सण असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पूजेला अनन्य साधारण महत्व आहे. ज्यांचे कडे खरे खुरे बैल आहेत त्यांची बैल धुणे, त्यांना सजविण्याच्या लगबग सुरू आहे.

आधुनिक युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे बैलांची जागा ट्रॅक्टरने घेततील आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे पोळा सणाला बैल पूजा करण्यासाठी मातीच्या बैलांना महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मातीच्या बैलांची मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते. भेंडा येथे आज लहान 5 बैल 20 रुपयांना, छोटी बैल जोडी 30 रुपयाला तर मोठी बैल जोडी 150 रुपयांना, मध्यम जोडी 80 रुपयांना विकली गेली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com