'जायकवाडी'त १२२४ क्यूसेकने पाण्याची आवक; किती आहे पाणीसाठा?, वाचा ताजे अपडेट

'जायकवाडी'त १२२४ क्यूसेकने पाण्याची आवक; किती आहे पाणीसाठा?, वाचा ताजे अपडेट
Jayakwadi dam

पैठण (आशिष तांबटकर)

जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) मुक्त पाणलोट क्षेत्रात मागच्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे (Rain) धरणांत पुन्हा पाण्याची आवक सुरू झाली आहे.

Jayakwadi dam
World Photography Day : तुम्हाला पण फोटोग्राफीची आवड आहे?, जाणून घ्या मोबाईल फोटोग्राफीसाठी बेस्ट टिप्स

सध्या धरणात १२२४ क्यूसेकप्रमाणे पाण्याची आवक सुरू असून धरणात ४०.६३ टक्के पाणी साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून (Department of Water Resources) देण्यात आली आहे.

Jayakwadi dam
Jayakwadi dam

जून (Jun) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै (July) महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात व ऊर्ध्व भागात चांगला पाऊस पडल्याने, जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यावर धरणात येणारी पाण्याची आवक पुर्णपणे बंद झाली होती. मात्र, मागच्या दोन दिवसापासून पावसाने सगळीकडे पुन्हा हजेरी लावल्याने, जायकवाडीत अल्प प्रमाणात पुन्हा पाण्याची आवक सुरू झाली आहे.

सध्या, जायकवाडी धरणात १२२४ क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू असून येत्या २४ तासात वाढ होण्याची शक्यता जायकवाडी धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे. काल गुरुवारी धरणात फूटामध्ये पाणी पातळी १५०९.०२ तर मीटरमध्ये ४५९.९५० एवढी पाणी पातळी असून एकूण पाणीसाठा १६२०.२०० दलगमी आहे. व जिवंत पाणी साठा ८८२.०९४ दलगमी सध्याच्या स्थितीत असल्याची माहिती जलसंलदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com