शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची पटनोंदणी उंचावली

शालाबाह्य विद्यार्थी संख्या ही वाढली
शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची पटनोंदणी उंचावली

संगमनेर (संदीप वाकचौरे)

देशभरातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढली असून सुमारे ७० टक्के विद्यार्थी हे शासकीय शाळेत दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातील हे दिसणारे चित्र करोनाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक मानले जात आहेत. तर खाजगी शाळांमधील सुमारे २५ टक्के विद्यार्थी खाजगी शाळेत शिकत आहेत. मात्र त्याच वेळेस देशातील पाच टक्के विद्यार्थी शाळेत प्रवेशित होऊ शकलेले नाहीत असा अत्यंत धक्कादायक निष्कर्ष प्रथम संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाद्वारे समोर आला आहे.

प्रथमच्यावतीने गेली सोळा वर्षे वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात येतो . त्यात विविध विषयासंदर्भातील निष्कर्षाची मांडणी करण्यात आलेली असते. त्यानुसार देशात २०१८ पेक्षा २०२१ मध्ये शासकीय शाळांचा पट हा सहा टक्क्याने उंचावलेला आहेत. खाजगी शाळांमधील पटसंख्या सुमारे आठ टक्क्यांनी घसरलेली आहे. खाजगी शाळांची घटलेली विद्यार्थीसंख्या चिंताजनक मानली जात आहे. त्याच वेळेस शाळेत पटनोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४.६ टक्के असून ही २०१८ पेक्षा २.१ ने अधिक आहे.

पटनोंदणीत मुली आघाडीवर

असरच्या अहवालात शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्या मध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक दिसून येते. पहिली दुसरी मध्ये दोन टक्के मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहेत. तिसरी ते पाचवीमध्ये ७१ टक्के मुलांचे प्रमाण असून ७७ टक्के मुलींचे प्रमाण आहे. हे शेकडा ६ टक्के अधिक आहे. तर सहावी ते आठवीच्या वर्गातील मुलींचे प्रमाण सुमारे सहा टक्क्याने अधिक आहे. याचा अर्थ खाजगी शाळांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक आहे. देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचे प्रमाण १३.२ टक्के उत्तर प्रदेशात उंचावल्या आहेत तर केरळमध्ये सुमारे १२ टक्के विद्यार्थी शासकीय शाळेत यावर्षी प्रकाशित झाले आहेत.

महाराष्ट्रात काय?

महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी शिकण्याचे प्रमाण ६०.५ टक्के इतके होते. मात्र २०२१ मध्ये यात वाढ होऊन ९.२ टक्के विद्यार्थ्यांनी अधिक प्रवेश घेतले आहेत. महाराष्ट्रात फोन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे शेकडा प्रमाण ८५ दशांश पाच टक्के इतके आहेत तर १०.३ टक्के विद्यार्थी यांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. एकूण मोबाईल धारक विद्यार्थ्यांपैकी ि सरासरी २५ टक्के विद्यार्थ्यांना केव्हाच प्र मोबाईल वापरता येत नाही. २५ टक्के श विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे मोबाईल नि सुविधा उपलब्ध होते. सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना अधून मधून मोबाईलची सुविधा उपयोगात आणता येते.

खाजगी शिकवणीला चांगले दिवस

करोनाच्या पार्श्वभूमीवरती पैसे देऊन शिकवणी लावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचे चित्र आहे. शासकीय शाळेतील सुमारे ४० टक्के विद्यार्थी खासगी शिकवणीला जात आहेत. तर खासगी शाळेतील ३८ टक्के विद्यार्थी शिकवणीच्या वर्गात प्रवेशित आहेत. शासकीय शाळेतील दहा टक्के विद्यार्थी संख्या उंचावले असून खाजगी शाळेतील बारा टक्के विद्यार्थी अधिक आहेत. पहिली दुसरी तील ३७% , तीसरी ते आठवीतील ३९ टक्के, नववी पेक्षा वरच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण ४१ टक्के इतके आहे. माध्यमिक स्तरावरील सर्वाधिक विद्यार्थी शिकवणीच्या वर्गाला जात असल्याचे चित्र आहे.

शासकीय शाळा समोर आव्हाने

असरच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण ९.२ इतकी उंचावले आहेत. हे प्रमाण अत्यंत मोठे आहे. पालकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शासकीय शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे सांगण्यात येते. पालकांची नोकरी गमावणे, स्थलांतर यासारख्या प्रश्नांमुळे शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र गेली काही वर्षे शासकीय शाळांची प्रयोगशीलता उंचावत आहे. त्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. विद्यार्थी संख्या वाढली असल्याने ही विद्यार्थी संख्या कायम ठेवणे यासाठी शिक्षकांना आपली प्रयोगशीलता कायम ठेवून गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहेत. तसे झाले तर येत्या काही वर्षांत शासकीय शाळांचे चित्र पालटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com