नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा - ना. थोरात

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा - ना. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) / Sangamner - शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगार बरोबर उत्पादकता वाढण्यासाठी मोठी मदत होईल. याकरिता सर्व शेतकर्‍यांनी कमी क्षेत्रात कमी पाण्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त एकरी उत्पादन वाढवा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर सन 2019- 20 या हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ हे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, डॉ. तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे, माणिकराव यादव, संभाजी वाकचौरे, दादासाहेब कुटे, सुरेश झावरे भास्करराव आरोटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी सेवानिवृत्त 41 कर्मचार्‍यांना अमृतमंथन व अमृत गाथा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर रविंद्र दगडू भोकनळ (निमज), रोहिदास निवृत्ती पवार (राजापूर), भास्कर पाटीलबा गोपाळे (सुलतानपूर), मुरलीधर सावळेराम वर्पे (कनोली), लक्ष्मण भाऊसाहेब गुंजाळ (खांडगांव), त्र्यंबक व्यंकट देशमुख (मंगळापूर), भाऊसाहेब बाबुराव येवले (मेहेंदुरी), जिजाभाऊ जानकू शिंदे (ओझर खु), शिवाजी विश्राम वर्पे (संगमनेर खु), दगडू लक्ष्मण बंगाळ (मेहेंदुरी), सुधाकर काशिनाथ नवले (औरंगपूर), भास्कर पांडूरंग आरोटे (मेहेंदुरी) या शेतकर्‍यांना सन्मानचिन्ह अमृतमंथन व अमृत गाथा पुस्तक, कलमी आंब्याचे रोप व रोख रकमेने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी ना. थोरात म्हणाले, कारखान्याने या वर्षी 13 लाख 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप केले आहे. आगामी काळात कमी पाण्यावर जास्त उत्पादन येण्यासाठी शेती विभागाने काम करताना शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी. ऊसाची लागवड करून विक्रमी एकरी 125 मेट्रीक टन पेक्षा जास्त उत्पादन करण्यासाठी शेतकर्‍यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्र बाहेरील शेतकर्‍यांचा मोठा विश्‍वास संपादन केला आहे. ऊस लागवड पद्धतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असून शेतकरीही त्याला चांगला प्रतिसाद देत आहे. ठिबक सिंचन पद्धत, पाच फूट सरी पद्धत या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. तरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून एकरी उत्पादन वाढवणे हेच उद्दिष्ट प्रत्येकाने ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आण्णा राहिंज, सिताराम वर्पे, केशव दिघे, किरण कानवडे, अ‍ॅड. शरद गुंजाळ, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, बाळासाहेब उंबरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com