आंदोलनाला पाठिंब्यासाठी नेवासा तालुक्यातील सेवानिवृत्त दिल्लीकडे रवाना

आंदोलनाला पाठिंब्यासाठी नेवासा तालुक्यातील सेवानिवृत्त दिल्लीकडे रवाना

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

सेवानिवृत्ती वेतनात वाढ व्हावी या मागणीसाठी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वाखाली1 ऑगस्ट पासून नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त कामगार दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

दिल्लीतील भविष्य निर्वाह निधी कार्यालय, भिकाजी कामा येथे हे उपोषण चालू आहे. देशातील पासष्ट लाख पेन्शनधारक आहेत. त्यांना सध्याची मिळणारी पेन्शन अत्यल्प असून या पेन्शनधारकांनी सहा ते सात वर्ष पासून अनेक प्रकारचे नवी दिल्ली येथे आंदोलन केलेले आहे.

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मोर्चात सहभागी होण्यासाठी नगर जिल्हातील सुमारे 450 पेन्शनधारक दि. 6 ऑगस्ट रोजी शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यात नेवासा तालुक्यातील बापुराव बहिरट, विनायक लोळगे, अशोकराव पोतदार, भानुदास कावरे, बाळासाहेब निकम, प्रभाकर बोरकर, किसन निकम, शिवाजी लांडे, सुभाष वाबळे, सोपान चौधरी, सय्यदनूर कंकर सय्यद,चंद्रकांत सोनवणे आदींचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com