छिंदम बंधूंच्या पोलीस कोठडीत वाढ

जातीवाचक शिवीगाळ प्रकरण
छिंदम बंधूंच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर | प्रतिनिधी

जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत २४ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक विशाल ढमे करीत आहेत.

नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकाला दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता. याप्रकरणी भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल आहे.

छिंदम बंधूंसह चारही जणांनी औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी छिंदम बंधूंचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने छिंदम बंधूंना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

Related Stories

No stories found.