डॉ. निलेश शेळकेच्या पोलीस कोठडीत वाढ

कर्ज फसवणूक प्रकरण
डॉ. निलेश शेळकेच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर |Ahmedagar

शहर सहकारी बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी डॉ. निलेश शेळके याच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपत असल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढून दिली आहे.

शहर सहकारी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात डॉ. शेळके विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो गेल्या अडीच वर्षापासून फरार होता. रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेला पकडण्यासाठी पुणे येथे गेलेल्या पोलीस पथकाला डॉ. शेळक सापडला होता. प्रथम जरे हत्याकांडात शेळके याची चौकशी करण्यात आली. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शेळके याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सुरूवातीला 30 डिसेंबरपर्यंत शेळके याला पोलीस कोठडी मिळाली होती. या गुन्ह्याचा तपास बाकी असून शेळके याच्याकडे चौकशी करणे बाकी असल्याने त्याला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्योती गडकरी यांनी केली. न्यायालयाने निरीक्षक गडकरी यांची मागणी मान्य करत शेळके याला 2 जानेवारीपर्यंत कोठडीत सुनावली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com