अहमदनगर : मोफत शिवभोजन 
थाळीत दीडपट वाढ

अहमदनगर : मोफत शिवभोजन थाळीत दीडपट वाढ

जिल्ह्यात महिनाभर मिळणार 5 हजार 250 थाळ्या

अहमदनगर (प्रतिनिधी) - वाढत्या करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच आता सध्या मिळणार्‍या शिवभोजन थाळीच्या दैनंदिन कोट्यात दीडपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे राज्यभरात दररोज 2 लाख तर नगर जिल्ह्यात 5 हजार 250 मोफत शिवभोजन थाळ्या मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर गरिबांसाठी आधी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. करोनाच्या पहिल्या लाटेत पाच रुपयात ही थाळी देण्यात आली. आता करोनाची दुसरी लाट आली असून यामुळे सरकारने संचारबंदी लागू केली आहे. याकाळात कोणीही उपाशीपोटी राहू नयेत, यासाठी मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. जिल्ह्यात 29 शिवभोजन केंद्र असून त्यातील 10 केंद्र हे नगर शहरात तर उर्वरित जिल्हा भरात आहे. त्या ठिकाणी आधी 3 हजार 500 थाळ्या मंजूर असून त्यात आता वाढ होणार आहे. राज्य सरकारने शुक्रवारी दीडपट शिवभोजन थाळ्यांना मंजूरी दिली असून यामुळे 1 हजार 750 थाळ्या वाढल्या आहेत. यामुळे आता दररोज गरिबांना सकाळी 11 ते दुपारी चार यावेळत शिवभोजन केंद्रात येणार्‍या प्रत्येकाला पार्सल स्वरूपात 5 हजार 250 थाळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

.................

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com