३० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर संतपिठाचे १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते उदघाटन

१ आँक्टोबर पासुन प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात
३० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर संतपिठाचे १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते उदघाटन

पैठण | प्रतिनिधी

तीस वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले पैठण (Paithan) येथील संतपिठ उदघाटनाचा (Santpith Inauguration) मुहूर्त ठरला असुन १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी (Marathwada Mukti Sangram Din) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आँनलाईन उदघाटन होणार आहे. अशी माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) व जिल्हाधिकारी डॉ. सुनील चव्हाण (Collector Dr. Sunil Chavan) यांनी संयुक्त पत्रकार परीषदेत दिली.

मंत्री भुमरे, व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संतपिठ इमारतीची (Santpith building) पाहणी केली. १७ सप्टेंबरला उदघाटन आणि १ आँक्टोबंर पासुन संतपिठात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याचे मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी यावेळी सांगितले.

संत साहित्य, तत्वज्ञान, व संगीताच्या (Saint literature, philosophy, and music) प्रमाणपत्र अभ्यासक्रमाने संत पिठाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असून अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा राहणार आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विधापिठ (Dr. Babasaheb Ambedkar, Marathwada) अभ्यासक्रम मंडळाचे समन्वयक प्रा. प्रविण वक्ते यांनी दिली.

तात्कालीन मुख्यमंत्री ए.आर अंतुले (A. R. Antulay) यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी पैठण येथे संतपिठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पैठणकर, संत, मंहत, वारकरी, संतपिठा लवकर सुरू व्हावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत होते. यासाठी अनेक वेळा आंदोलन देखील झाली. पैठणला मंत्री पद मिळ्यानंतर संतपिठ लवकर सुरू होणार अशी आपेक्षा पैठणकरांची होती. मंत्रीपद मिळाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी सतत शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे संतपिठाच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होणार असल्याने वारकरी, व भाविकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com