बाभळेश्‍वरला नक्षत्र पोषण परसबागेचा शुभारंभ

बाभळेश्‍वरला नक्षत्र पोषण परसबागेचा शुभारंभ

बाभळेश्‍वर (वार्ताहर) / Babhaleshwar - निरोगी आरोग्यासाठी निरोगी आहार हा गरजेचा आहे. नक्षत्र परसबाग ही संकल्पना राबवून प्रत्येक गावात किमान शंभर परसबागा उभ्या राहण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. यासाठी जनसेवा फाऊंडेशन आपल्याला सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्रात पंचायत समिती राहाता आणि जनसेवा फाउंंडेशन लोणी यांच्यावतीने नक्षत्र पोषण परसबागेतच्या शुभारंभप्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, बबलू म्हस्के, पंचायत समितीचे सदस्य संतोष ब्राह्मणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे, गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख अनुराधा वांढेकर, प्रमोद पांडे, उपसरपंच अमृत मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत ही नक्षत्र परसबाग आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. गावपातळीवर समूह प्रेरिकांनी यांची माहिती जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सौ. विखे पाटील यांनी सांगून या माध्यमातून महिलांमध्ये विषमुक्त भाजीपाला ही संकल्पना राबवून सेंद्रिय परस बागेला प्रोत्साहन द्यावे. बचत गटाद्वारे ही संकल्पना राबविताना प्रत्येक गावात परसबागेचे निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यानिमित्ताने नक्षत्र पोषण परसबागेचे मॉडेल तयार करून या मॉडेलमध्ये प्रत्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी प्रत्यक्ष लागवड करून प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थित महिलांना परसबागेची माहिती दिली. उपसरपंच अमृत मोकाशे यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com