
करजगाव | वार्ताहर
गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला असुन गणपती मूर्तीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे.आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीवर वेगवेगळ्या प्रकारचे रंग, चकाकणारी जरी लावणे तसेच मूर्तीवर खडे -हिरे लावण्यात तसेच नक्षी काढण्यात मुर्तीकार मग्न आहेत. अनेक ठिकाणी मूर्तीची ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
नेवासा तालुक्यात ठिकठिकाणी मूर्ती विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत. गणेशमूर्तीला वेगवेगळे रंग, रंगाचे शेड कसे असावेत तसेच हिरे-खड़े लावलेली मूर्ती, मूर्तीवरील पितांबर, उपरणे यांना चकाकणारी जरी लावली जात आहेत. विविध रूपातील मूर्तीना मागणी असते. मागणीनुसार मुर्ती तयार करूण दिल्या जातात. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, बालमूर्ती या मुर्तीना भाविक पसंती देत असल्याचे अंमळनेर येथिल मुर्तीकार नामदेव बेंबळे यांनी सांगितले.