आरोग्य विभागाच्या रॅकिंगमध्ये झेडपी आरोग्य विभाग अव्वल

जून, जुलै महिन्यांतील कामगिरी
आरोग्य विभागाच्या रॅकिंगमध्ये 
झेडपी आरोग्य विभाग अव्वल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मुल्यमापनात नगर जिल्हा परिषद आरोग्य विभाग राज्यात अव्वल ठरले आहे. जून आणि जुलै महिन्यांच्या कामगिरीत झेडपी आरोग्य विभागाला राज्यात पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर आहे.

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यावतीने दर महिन्यांला शासकीय आरोग्य संस्थांचे आरोग्य विभागाच्या सेवांच्या इंडिकेटरनिहाय मुल्यमापन करण्यात येते. यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभाग यांची कामगिरी तपासून त्यांचे राज्य पातळीवर स्थान निश्चित करण्यात येते. यात संबंधीत शासकीय आरोग्य संस्थेने माता बाल आरोग्य, कुटूंब कल्याण कार्यक्रम, एकात्मिक सर्वेक्षण कार्यक्रम, असंसर्ग जन्य आजार सर्वेक्षण, नियमित लसीकरण, किटकजन्य रोग्य नियंत्रण कार्यक्रम, आयुष्यमान भारत योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध कार्यक्रम, जिल्हा क्षय रोग आणि कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम यात महिना भरात केलेल्या कामगिरीचे मुल्यमान करून त्यानूसार राज्य पातळीवर पहिल्या तीन जिल्ह्यांना क्रमवारी देण्यात येते.

या कार्यक्रमात नगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जून महिन्यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. यात नगर जिल्हा परिषदेला 58.5 गुण मिळालेले आहे. दुसर्‍या स्थानावर गडचिरोली जिल्हा असून या जिल्ह्याला 56.66 टक्के गुण मिळालेले आहे. तर तिसर्‍या स्थानावर उस्मानाबाद जिल्हा असून या जिल्ह्याला 55.98 टक्के गुण मिळालेले आहे. जुलै महिन्यात राज्यात पहिल्याक्रमांकावर उस्मानाबाद जिल्हा असून या जिल्ह्याला 56.13, दुसर्‍या स्थानावर नगर जिल्हा परिषद आरोग्य विभाग असून 55.51 टक्के गूण मिळालेले आहे. तर तिसर्‍या स्थानावर गोंदिया जिल्हा असून या जिल्ह्याला 53.35 टक्के गुण मिळालेले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांनी ही क्रमावारी जाहीर केली आहे.

जून, जुलै महिन्यांत राज्य पातळीवर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या मुल्यमापनात नगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने चांगली कामगिरी केलेली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी चांगली कामगिरी बजावणार असून यापूर्वी देखील आरोग्य विभाग दक्ष राहून ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवत आहे.

- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com