शेवगाव/पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

तालुक्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुकीत 440 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असून या निवडणुकीत एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही मात्र

काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पाथर्डी तालुक्यातील तिनखडी, खेर्डे, सोमठाणे खुर्द या तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 48 ग्रामपंचायतीच्या 1 हजार 295 उमेदवारा पैकी 440 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता 843 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीतील ग्रामपंचायतच्या काही सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून रात्री उशिरापर्यंत अर्ज तपासणी सुरु असल्याने नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीच्या किती जागा बिनविरोध झाल्या याची माहिती समजू शकली नाही.

दरम्यान उमेदवारी माघार दिवशी तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरुप आले होते. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गावोगाव प्रयत्न झाले पंरतु हटीवादाने त्या बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. दुपारी हलक्या पावसाला सुरवात झाली. या पावसात अनेक उमेदवार तहसील कार्यालयाच्या मोकळ्या आवारात चिन्ह घेण्यास लगबग करीत होते. दरम्यान पाथर्डी तालुक्यात 105 सदस्यांसह तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.