राहुरीत कर्डिले गटाचे कार्यकर्ते तनपुरे गटात दाखल

राहुरीत कर्डिले गटाचे कार्यकर्ते तनपुरे गटात दाखल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राष्ट्रीय नेते खा. शरद पवारांच्या (MP Sharad Pawar) शिकवणीप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश (NCP Entry) करणार्‍या कार्यकर्त्यांचा (Workers) योग्य तो सन्मान राखला जाईल, याची जबाबदारी माझ्यावरही असल्याने शहाजी जाधव व त्यांच्या सहकार्‍यांचा योग्य तो मानसन्मान केला जाईल. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे मी स्वागत (welcome NCP entry) करतो, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Energy and Urban Development Prajakt Tanpure) यांनी केले.

भाजपाचे (BJP) राहुरी नगरपरिषदेचे (Rahuri Municipal Council) नगरसेवक विरोधकांचे खंदे समर्थक शहाजी जाधव (Shahaji Jadhav) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह प्रवेश (Entered the NCP with supporters) सोहळा राष्ट्रवादी भवन नगर येथे पार पडला. राहुरीतील माजी आ. शिवाजीराव कर्डिले गटातील (Former MLA Shivajirao Kardile Group) कार्यकर्ते ना. तनपुरे (Minister Prajakt Tanpure) यांच्या गटात दाखल झाल्याने तालुक्यात राजकीयदृष्ट्या खळबळ उडाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (NCP District President Rajendra Phalke) यांनी प्रवेश देऊन त्यांचे राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून स्वागत केले.

बर्‍याच दिवसापासून ना. तनपुरे (Minister Prajakt Tanpure) यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. राष्ट्रवादीच्या प्रवेशाने (NCP Entry) ही मनोकामना पूर्ण करून येवले आखाडा व राहुरी शहराच्या प्रगतीसाठी ना. तनपुरे यांच्या नेतृत्वाला राज्यस्तरावर बळकटी देण्यासाठी पूर्ण निष्ठेने पक्षाचे काम करू, अशी ग्वाही पक्ष प्रवेशानंतर शहाजी जाधव यांनी दिली. यावेळी नगर तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शिकारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक झरेकर, बाळासाहेब शिकारे, विष्णू आढाव आदी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी रोहिदास कर्डिले, नगराध्यक्ष राहुरी अनिल कासार, बाळासाहेब मुंडे, संजय साळवे, दशरथ पोपळघट, प्रकाश भुजाडी आदी उपस्थित होते.

यावेळी आबा येवले, मधुकर पोपळघट, सुनील कवडे, अण्णा म्हसे, अनिल जाधव, शुभम शेवंते, सुहास जाधव, तानाजी येवले, दिलीप जाधव, दत्तात्रय शेटे, पिंटू मोढे, श्रीकांत जाधव, अक्षय जाधव, मच्छिंद्र शेटे, सुधाकर जाधव, पोपट वामन, गणेश नेहे, शामराव ढोकणे, सचिन मोढे यांनी शहाजी जाधव यांच्यासमवेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

Related Stories

No stories found.