पोहेगावमधील करोना बाधितांची संख्या २५ वर
सार्वमत

पोहेगावमधील करोना बाधितांची संख्या २५ वर

पोहेगाव कालपासून पाच दिवस बंद करण्यात आले आहे

Nilesh Jadhav

रांजणगाव देशमुख | वार्ताहर | Ranjangaon Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज पुन्हा आठ करोना रुग्ण सापडले आहेत. काल बाधित सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील हे आठ जण आहेत. कालपर्यंत सतरा जण बाधित होते. आज आणखी आठ वाढल्याने पोहेगावतील बधितांची संख्या पंचवीस झाली आहे. अशी माहिती पोहेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बदडे यांनी दिली आहे.

पोहेगाव कालपासून पाच दिवस बंद करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आपली काळजी घ्यावी. मास्क व सॅनिटीझरचा वापर करावा. सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com