कोपरगावमध्ये एकूण करोना बधितांची संख्या 35 वर

आज तिघांचे अहवाल आले पॉझिटिव्ह
कोपरगावमध्ये एकूण करोना बधितांची संख्या 35 वर

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

शहरातील स्वामी विवेकानंद नगर मधील डॉक्टरची 58 वर्षीय पत्नी, तसेच शहरातील 58 वर्षीय डॉक्टर व तालुक्यातील रवंदा येथील 30 वर्षीय युवक असे तीन जणांचे करनो अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल तपासणी केलेल्या 31 अहवालामधील 20 अहवाल आज प्राप्त झाले आहे त्यात तीन पॉझिटिव्ह तर 17 निगेटिव्ह आले आहे. 11 अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com