खा. लोखंडेंच्या समोरच ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा

ठाकरे गटाचे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात
खा. लोखंडेंच्या समोरच ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा

टाकळीमिया | वार्ताहर

खासदार सदाशिव लोखंडे हे सध्या 32 गावच्या दौऱ्यावर आहेत ते राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे आले त्यावेळी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत राडा केला नंतर या शिवसैनिकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. 

 शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे सध्या या मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 32 गावच्या दौऱ्यावर आहेत ते या मतदार संघाचे दुसर्‍यांदा नेतृत्व करीत आहेत मागील पाच वर्षांत या मतदारसंघात कुठलेही भरीव काम त्यांनी केले नाही त्यामुळे त्यांच्याविषयी मोठी नाराजी होती ते दुसऱ्यांदा या मतदार संघात उमेदवार म्हणून उभे राहिले ते निवडून येतात की नाही ही अवस्था निर्माण झाली होती परंतु शेवटच्या पाच दिवसात  32 गावात वातावरण बदलले व ते निवडुन आले.

मात्र आता चार वर्ष होत आली परंतु या 32 गावच्या समस्या जैसे थे राहिल्या. सध्या महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथ झाली ते शिंदे गटात गेले. ते टाकळीमिया मध्ये आल्यानंतर गावच्या ग्रामस्थांनी त्यांच्या समोर राहुरी टाकळीमिया ते लाख तसेच देवळाली प्रवरा ते टाकळीमिया मुसळवाडी रोडचे काम, बंद झालेले टाकळीमिया रेल्वेस्टेशन, पिण्याच्या पाण्याची समस्या, प्रवरा नदीवरील पुल असे अनेक समस्या त्यांच्या समोर मांडल्या ते ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी खा लोखंडे यांचा निषेध करत 50 खोके एकदम ओके, शिवसेना कुणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला त्यानंतर पोलीसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com