देवळालीत चार दिवसांत 15 मुलांना करोना

पालकांमध्ये घबराट
देवळालीत चार दिवसांत 15 मुलांना करोना

राहुरी (प्रतिनिधी) - दुसर्‍या लाटेचा सामना करताना राहुरीकरांची दमछाक होत असताना आता करोना महामारीची तिसरी लाट येऊ घातली. त्याचा लाटेचा विशेष करुन लहान मुलांवर प्रभाव होणार आहे. त्याचे प्रत्यंत्तर देवळाली प्रवरात आले आहे. दि.24 ते 27 मे या चार दिवसांत देवळाली प्रवरा शहरात 1 ते 16 वर्ष वयाचे 15 लहान मुले करोनाबाधित आढळले असल्याने करोनाची तिसरी लाट सुरु झाली की काय? या भितीने नागरिकांत घबराट पसरली आहे.

देवळाली प्रवरा शहरात नगर पालिकेच्या वतीने वॉर्डनिहाय रॅपिड टेस्ट केली जात आहे. करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.शहरात सध्या लहान मुलांमध्ये करोनाची बाधा आढळून येत आहे.देवळाली प्रवरा नगर पालिकेस प्राप्त झालेल्या यादीनुसार दि.24 मे रोजी 1 ते 16 वयोगटातील 8 लहान मुलांना करोनाची लागण झाली आहे. दि.25 मे रोजी 4 ते 14 वयोगटातील 2 लहान मुले, दि.26 रोजी 1 ते 16 वयोगटातील 4 लहान मुले, दि.27 मे रोजी 15 वर्ष वयोगटातील 1 मुलगा करोनाबाधित आढळला आहे. गेल्या चार दिवसात 15 मुले करोनाबाधित आढळल्याने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कोव्हिड सेंटरमध्ये लहान बालकांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ नसल्याने लहान मुलांच्या पालकांना रुग्णास घेऊन शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. कोव्हिड सेंटरमध्ये बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करावा, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घ्यावी. लहान मुलांना गर्दीपासून लांब ठेवावे. घरातील आजारी व्यक्तीजवळ लहान मुले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा विशेष करुन लहान मुलांवर प्रभाव होणार आहे. देवळाली प्रवरात चार दिवसात 15 लहान मुले करोनाबाधित आढळल्याने उपचारासाठी जागा उपलब्ध होईल, तेथे रुग्णास दाखल करावे लागत आहे. त्यामुळे आता पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.