मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

अपघातातील मृत आणि जखमी नेवाशातील
मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

नेवासा | तालुका वार्ताहर

मित्राच्या लग्नाला जात असताना एका भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला आहे. कार भरधाव वेगात असतांना चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कारने पलट्या खाल्ल्या आहेत. आज पहाटेच्या सुमारास घडली. यात नेवासा येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कांगुने (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (वय 28) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी
डाॅक्टरने संपवले अख्खे कुटूंब, तिघांची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

नेवासा येथून मित्राच्या लग्नाला बीडकडे येत असताना पेंडगाव जवळ चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे काही कळायच्या आत तीन ते चार वेळा पलट्या घेत कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात ऐवढा भीषण होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या घटनेने नेवासा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी
लळा असा लावावा की...! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com