श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावाच्या हद्दीत सोमवार (दि. 8) रोजी कुत्र्यांनी शीर तोडलेला मृतदेह उकरून काढला होता.

या मृतदेहाची ओळख पटवत पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा खून करणार्या एका महिलेसह तिच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले.

यात रमेश सदाशिव जाधव (रा. आंबेगाव जिल्हा पुणे) याचा अनैतिक संबंधाच्या कारणातून श्रीगोंदा तालुक्यात आणून पाच जणांनी तीक्ष्ण हत्याराने त्याचे शीर धडावेगळे करून मृतदेह जमिनीत पुरला तर शीर एका ठिकाणी जाळले अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

टाकळी कडेवळीत हद्दीत माळरानावर एका पुरुषाचा शीर नसलेला पुरुषाचा मृतदेह कुत्र्याने उकरून काढला होता. या व्यक्तीच्या अंगावर शुभम टेलर पुणे 46 असे लेबल असल्याने याचा तपास पुणे जिल्ह्यात करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये रमेश जाधव हे मिसिंग असल्याचे दाखल होते.

सदर मृतदेह नातेवाईक यांना दाखवला असता ओळख पटली. यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासले. यात संशयित आरोपी म्हणून सुषमा रवींद्र गवाले, तेजस बाळासाहेब भोसले,(रा.माळेगाव, बारामती), राजेश विठ्ठल गायकवाड (रा. माजगाव, जिल्हा सातारा), अमोल गोविंद कांबळे, प्रशांत बजरंग साबळे (रा.माळेगाव) यांनी रमेश सदाशिव जाधव यांना माळेगावमध्ये जमीन दाखवण्याच्या कारणातून बोलावून घेऊन जाधव यांना सिद्धटेक टाळकीकडेवळीत हद्दीत घेऊन आले.

तेथे जाधव यांचे शीर धारदार सतुरने धडावेगळे करण्यात आले. तर मृतदेह खड्डा करून पुरला आणि शीर लपवले यानंतर दोन दिवसांनी पुन्हा येऊन शीर निर्जनस्थळी जाळले अशी माहिती उजेडात आली. यात मयत हा फोन करून शरीर सुखाची मागणी करत होता. यामुळे इतर चार जणांच्या मदतीने खून करण्यात आला.

पोलिसांनी चार दिवसांत गुन्ह्याचा तपास लावला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस पथक सहाययक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, विठ्ठल पाटील, पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, दादा टाके, किरण बोराडे, अमोल कोतकर, विनायक जाधव, संजय काळे, गोकुळ इंगवले, लता पुराणे, प्रशांत राठोड, राजू भोर आदी तपास करत आहेत.