अनैतिक संबंधातून खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल
अनैतिक संबंधातून खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

अहमदनगर (प्रतिनिधी) -

अनैतिक संबंधातून शेवगाव येथील बापुसाहेब घनवट यांचा खून केेल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांना दोषी धरून

जन्मठेप व 22 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. कृष्णा पुनमसिंग भोंड, परमेश्वर पुनसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे (तिघे रा. रामनगर, शेवगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत. यातील कृष्णा पुनमसिंग भोंड याचा जेलमध्ये असताना मृत्यू झाला आहे. जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.

शेवगाव-पाथर्डी रोडवरील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेत एक महिला पालावर राहत होती. 7 ऑगस्ट 2019 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बापुसाहेब घनवट त्याठिकाणी गेले असता तेथे उपस्थित असलेले कृष्णा भोंड, परमेश्वर भोंड व लक्ष्मण कांबळे यांनी बापुसाहेब घनवट यांना महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणातून मारहाण केली होती.

या मारहाणीत बापुसाहेब घनवट यांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसर्‍या दिवशी मयत बापुसाहेब यांचा भाऊ काकासाहेब एकनाथ घनवट यांच्या फियादीवरून अज्ञात इसमांविरूद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये कृष्णा भोंड, परमेश्वर भोंड व लक्ष्मण कांबळे यांनी बापुसाहेब घनवट यांचा खून केल्याचे समोर आले.

पोलिसांनी तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून सहायक पोलीस सुजित ठाकरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने एकुण 8 साक्षिदार तपासले गेले. न्यायालयासमोर आलेला परिस्थतीजन्य पुरावा, अतिरिक्त सरकारी वकिल अनिल सरोदे यांचा युक्तीवाद ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी पोलीस हवालदार एम. ए. थोरात यांनी वकिल सरोदे यांना मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com