आजारपणाच्या नैराश्यातून वृद्धाने संपविले जीवन

आजारपणाच्या नैराश्यातून वृद्धाने संपविले जीवन

हातावर वार केल्याने पत्नीही जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आजारपणाच्या नैराश्यातून वृद्ध दांपत्याने हातावर वार करून नस कापून घेतल्याचा प्रकार भिंगारमधील द्वारका कॉलनीमध्ये घडला. यात वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

उशन्ना रामन्ना वरगंठे (वय 75) असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांची पत्नी शकुंतला (वय 69) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भिंगारमधील द्वारका परिसरामध्ये हे जोडपे गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे. त्यांना दोन मुले असून एक मुलगा सावेडी परिसरात तर दुसरा पुणे येथे राहतो. उशन्ना वरगुंठे व त्यांच्या पत्नी शकुंतला आजारी होते. गेल्या काही वर्षापासून ते दोघेही उपचार घेत होते. आजारपणाच्या नैराश्यातून दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. धारधार वस्तूने दोघांनी स्वत: च्या हातावर वार केले. यात नस कापली गेल्याने रक्त पुरवठा थांबला. उशन्ना यांचा मृत्यू झाला तर पत्नी शकुंतला जखमी झाल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com