मधुबन कॉलनीत वृक्षांची बेकायदा कत्तल

मधुबन कॉलनीत वृक्षांची बेकायदा कत्तल

गुन्हे दाखल करा : उपमहापौर भोसले

अहमदनगर (प्रतिनिधी)

सावेडीच्या सहकारनगरमधील मधुबन कॉलनी येथे काहींनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर उपमहापौर गणेश भोसले यांनी मधुबन कॉलनी येथे पाहणी करून वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला.

पाहणी करताना भोसले म्हणाले की, केंद्र, राज्य व महापालिका वृक्ष लागवडीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. परंतु विघ्नसंतोषी नागरिक बेकायदेशीरपणे नगर शहरातील काही भागांमध्ये वृक्षांची कत्तल करीत आहे. ही बाब निंदनीय आहे.

यापुढील काळामध्ये जे कोणी नागरिक बेकायदेशीर वृक्षतोड करीन अशा नागरिकांवर दंडाची आकारणी न करता न त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा उपमहापौर भोसले यांनी पाहणी करताना दिला. यावेळी मनपा उद्यान प्रमुख मेहर लहारे, शशिकांत नजान, सागर गोरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com