कर्जतला अवैध वृक्ष तोडणारांची धरपकड

टेम्पोसह साहित्य, लाकूड जप्त, नगर पंचायतीची कारवाई
कर्जतला अवैध वृक्ष तोडणारांची धरपकड

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत जवळ असलेल्या बर्गेवाडी परिसरात सुरु असलेल्या विनापरवानगी अवैध वृक्षतोडी विरोधात नगरपंचायतीच्या पथकाने कारवाई करत धरपकड केली आहे.

गुरव पिंपरी येथील चार-पाच लोकांच्या टोळीकडे असणारे कटर मशीन व सर्व साहित्य तसेच 407 टेम्पो जप्त करण्यात आला. या लोकांनी तीन कडुनिंबाची झाडे अवैधरित्या तोडल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी आज अवैध वृक्षतोड सुरु असल्याचे समजताच नगर पंचायत पथकामार्फत कारवाई करून पहिल्या दिवशी ज्याठिकाणी कारवाई करण्यात आली त्याच ठिकाणी दुसर्‍या दिवशी देखील अवैध वृक्षतोड सुरु असल्याचे समजताच परत धडक कारवाई करण्यात आली.

आजच्या कारवाईत मुळेवाडी येथील एक 407 टेम्पो व अन्य वृक्षतोडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन्ही टोळ्यांवरती शासन निर्णयानुसार सक्त दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. चौकशी केली असता संबंधित शेतकर्‍याने केवळ 3 हजार 600 रुपयांसाठी 18-20 वयाची 4 कडुनिंबाची झाडे विकली असल्याचे समजले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.