
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो तालुका पोलिसांच्या पथकाने खोकर शिवारात पकडला. 12 हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळूसह टेंम्पो असा 4 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चालकास अटक करण्यात आली असून मालक मात्र पसार आहे.
श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना, खोकर (ता. श्रीरमापूर) येथे एक इसम अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर अतुल बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन बाबर, होमगार्ड लांडे यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासंदर्भात सूचना केली होती.
पोलीस पथक रात्री 11.50 च्या. सुमारस खोकर शिवारात गस्त करीत असताना एक वाळू भरलेला टॅम्पो जोरात येत असताना दिसला. त्याला थांबविले असता सदर टॅम्पो चालकाने वाळुने भरलेला टॅम्पो पोलिसाना चकवा देवुन वेगाने चालवून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला मोठ्या शिताफीने वाहन व चालक ताब्यात घेतले. तसेच 4,40,000 रुपये किंमतीचा टाटा टॅम्पो (नं. एमएच 17 टी 2644) व टॅम्पोच्या मागील हौदामध्ये भरलेली 12,000 रुपये किंमतीचीदोन ब्रॉस वाळू असा 4,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाळू वाहतूक करणेबाबत शासकीय परवाना विचारला असता त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी वाहन व चालक यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. वाहन चालक व वाहन मालक यांचे विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 92/2023 भादवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. असून आरोपी लालु ऊर्फ तानाजी बबन आहेर (वय 34, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याला अटक केली. सदर गुन्ह्यातील वाहन मालक गजानन आण्णासाहेब राऊत (रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर) पसार आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, आणि उपविभागिय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक संजय निकम व अतुल बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन बाबर, राजेंद्र लंवाडे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी वारे, चालक पोलीस कॉन्स्टेबल चाँद पठाण, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार यांनी ही कामगिरी केली.