अवैध वाळू वाहतूक करणार्‍यास पोलिसांनी गोंधवणीत पकडले

1 ब्रास वाळूसह 2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त
file photo
file photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारी एक टाटा इन्स्ट्रा गाडी पोलिसांनी गोंधवणी महादेव मंदिर परिसरात पकडली. याप्रकरणी पोलिसांनी 1 ब्रास वाळूसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून श्रीरामपूर शहर पोलिसांत एका जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

गोदावरी व प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलीस नाईक रघुनाथ कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, व अडांगळे यांनी पोलिसांच्या पथकाने काल पुणतांबा या दिशेने येत असलेल्या विनानंबरचे टाटा इन्स्ट्रा गाडीस महादेव मंदिर परिसरात कमानीजवळ, गोंधवणी या ठिकाणी अडवली. या गाडीत विना परवाना अवैध वाळू आढळून आली. पोलिसांनी या वाळूसह विनानंबरची टाटा इन्स्ट्रा गाडी यासह रोख रक्कम 2 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 894/2022 प्रमाणे साहिल दत्तात्रय परदेशी याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com