
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची चोरून वाहतूक करणार्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांच्याकडूील दहा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सुधीर संभाजी शिरसाट (रा. आसरानगर, पाथर्डी) व चालक शिवाजी महेंद्र होळकर (रा.कांबी,ता.शेवगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे ओहत. त्यांच्याविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. बुधवारी (दि.12) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास तोंडोळी शिवारात पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी बोधेगाव येथून ते पाथर्डीकडे जाणारा पांढरा डंपर वाळू घेऊन चालला होता.
डंपर चालक शिवाजी होळकर याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हे डंपर व वाळू सुधीर शिरसाट याची असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी होळकर याला ताब्यात घेतले व वाळू आणि डंपर जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे नगरचे शिवाजी ढाकणे यांनी पोलिसांत तक्रार केल्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सुधीर शिरसाट पसार आहे.
सहाय्यक फौजदार सुरेश बाबर, स्थानिक गुन्हे शाखेचे विशाल गवांदे, सागर ससाणे, जालिंदर माने, रोहीत येमुनल यांनी कारवाईत सहभाग घेतला.वाळु चोरा विरु्दध पोलीस व महसूल विभागाने जोरदार मोहीम राबविली आहे. मात्र ठराविक लोकांवरचच कारवाई केली जाते अशी चर्चा वाळू धंद्यातील काहीजण करीत आहेत.स्थानिक वाळू चोरांना अभय देण्याचे काम काहीजण करीत असल्याचे बोलले जाते.