अवैध वाळू वाहतुक करणारे दोन डंपर जप्त

40 लाखाचा मुद्देमाल || स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
अवैध वाळू वाहतुक करणारे दोन डंपर जप्त

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील कांबी (Kambi) येथे अवैध वाळू वाहतुक (Illegal Sand Transport) करणार्‍याविरुध्द जिल्हा स्थानिक गुन्हे (LCB) शाखेच्या पथकाने कारवाईत करत दोन डंपरसह (Dumper) चार ब्रास वाळू (Sand) असा 20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.5) पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

अवैध वाळू वाहतुक करणारे दोन डंपर जप्त
वांबोरीतील लाल कांदा व तूरीचा वाचा भाव

डंपर (Dumper) चालक शैलेश रामदास सोनवणे (22, रा. चापडगाव, ता. शेवगाव) यास ताब्यात घेतले आहे. तर दुसरा डंपर चालक विजय अशोक चेमटे (रा. शिंगोरी ता. शेवगाव) हा पसार झाला आहे.

अवैध वाळू वाहतुक करणारे दोन डंपर जप्त
पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत

स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke) यांना शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात अवैध वाळू उत्खनन (Illegal Sand Mining) व वाहतुक सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, पो. हेकाँ. दत्तात्रय गव्हाणे, संदिप घोडके, शंकर चौधरी, सचिन अडबल, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोंढे, शिवाजी ढाकणे आदींच्या पथकाने तालुक्यातील कांबी ते हातगाव रस्त्यावर सापळा लावला होता.

अवैध वाळू वाहतुक करणारे दोन डंपर जप्त
नगर..थंडाथंडा कूल कूल !

गुरुवारी पहाटेच्या सुमारास या रस्त्याने दोन राखाडी रंगाचे डंपर अवैध वाळू उपसा (Illegal Sand Mining) करुन घेवून येतांना आढळून आले. पथकातील कर्मचार्‍यांनी चालकास इशारा करुन वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. विचारपूस केली असता सदर डंपर पप्पू उर्फ पिवळया पातकळ (रा. चापडगाव) यांच्या मालकीचे असल्याचे समजले. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात (Shevgav Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन डंपर (Dumper) व चार ब्रास वाळू (Sand) असा 20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला.

अवैध वाळू वाहतुक करणारे दोन डंपर जप्त
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघू नये म्हणून अजित पवारांची वक्तव्ये - खा. डॉ. विखे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com