चिंचोलीत बोटीने बेकायदा वाळूसाठा तर चांदेगावला खुलेआम वाळूतस्करी

चिंचोलीत बोटीने बेकायदा वाळूसाठा तर चांदेगावला खुलेआम वाळूतस्करी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात बेकायदा वाळू तस्करीला उधाण आले आहे. एकीकडे रात्री-अपरात्री बेकायदा वाळू वाहतूक खुलेआर सुरू असतानाच वाळूची साठेबाजी सुरू आहे. राहुरी महसूल आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चिंचोली फाटा येथील प्रवरा नदीपात्रालगत सुमारे दोन हजार ब्रासचा बेकायदा वाळूसाठा करण्यात आला असून बोटीच्या सहाय्याने रात्री-अपरात्री खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. तर चांदेगाव येथेही प्रवरा नदीपात्रातून सर्रासपणे वाळू उपसा चालू असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही पोलीस आणि महसूल प्रशासनाने कानावर हात ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, चिंचोली येथे करण्यात आला बेकायदा वाळू साठा ताब्यात घेऊन वाळू उपसा करणारी बोट पोलीस आणि महसूल प्रशासनाने उद्ध्वस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चिंचोली परिसरातील प्रवरा नदीपात्रात सुमारे महिन्यापासून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. त्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला असून नदीपात्रालगतच सुमारे 2 हजार ब्रासचा वाळूसाठा करण्यात आला आहे.

पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या आर्थिक आशिर्वादाने खुलेआम वाळू उपसा करून केलेला साठा पंचनामा करून महसूलने ताब्यात घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या. मात्र, त्याकडे प्रशासनाने अर्थपूर्ण डोळेझाक केली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे. नदीपात्रालगत असलेली बोट प्रशासनाने उद्ध्वस्त केली नाही तर त्या बोटीचा नायनाट करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

तर चांदेगाव येथेही प्रवरा नदीपात्रातून खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे. रात्री-अपरात्री डंपरच्या सहाय्याने वाळू वाहतूक होत असून त्याकडे महसूल व पोलीस खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com