शासकीय टेंडरच्या नावाखाली नियमबाह्य वाळू उत्खनन

वैजापूर तालुका भागवतोय औरंगाबाद व अहमदनगरच्या वाळूची तहान
शासकीय टेंडरच्या नावाखाली नियमबाह्य वाळू उत्खनन

वैजापूर | दिपक बरकसे

गोदावरी व शिवना (Godavari and Shivna River) या दोन पात्रातील लिलाव प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली. यंदा तीन वाळू घाटांपासून महसूल प्रशासनाला १ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. मात्र ठेकेदारांच्या 'टस्सल' मुळे तब्बल ८ कोटी १९ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे.

एक मार्च पासून या उत्खलनाला सुरूवात देखील झाली आहे. मात्र या उत्खनातुन एक गंभीर बाब समोर आली आहे. वाळू लिलाव प्रक्रियेच्या नियमानुसार लिलाव झालेल्या घाटांमधून ठरवून दिलेल्या मापा एवढा वाळू उपसा हा ट्रॅक्टरद्वारे मजुरांच्या साह्याने लिलाव हद्दीच्या बाहेर टाकून तिथून वाहतूक करणे असा नियम आहे. हे सर्व नियम पायमल्ली (Illegal sand mining) करून वैजापूरच्या (Vaijapur) बाभूळगाव (Babhulgoan) येथे जेसीबी व पोक्लेनच्या साह्याने ठेकेदारांनी वाळू उपसा सुरू केला आहे. जिथं यंत्राची परवानगीच नाही तिथं थेट ते पाच ते सहा जेसेबी व पोक्लेनच्या साह्याने उपसा सुरू केला आहे.

विशेष म्हणजे या सर्व नियमबाह्य उत्खलनाला गावकऱ्यांनी देखील विरोध दर्शवला आहे. असे असले तरी या यंत्राद्वारे ह्या होणाऱ्या नियमबाह्य उत्खननाला अलिखित परवानगी दिली तरी कुणी, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकराचे व्हिडिओफीत देखील सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. हा सर्व नियमबाह्य प्रकार चार दिवसांपासून सुरू असला तरी प्रशासनाने ह्या ठिकाणी साधी कारवाई होतांना दिसली नाही.

अभय कुणाचे?

एक तारखेपासून ठेकेदारांना आपल्या वाळु घाटाचा ताबा मिळाला आहे. एक तारखेपासूनच ह्या सर्व ठिकाणी यंत्रणा वापरून वाळू उपसा केला आहे. याची चर्चा जिल्हाभर पसरली असली तरी मात्र प्रशासन आमच्या पर्यंत असे व्हडिओ पोहचले नसल्याचे सांगतात. ही मात्र गंभीर बाब म्हणावी लागेल. तर शासकीय टेंडर झालेल्या ठिकाणाचा ताबा ठेकेदारांना एक तारखेला देण्यात आला आहे. नियमानुसार जेसीबी व पोक्लेन सारख्या यंत्रणा वापरून उपसा करता येत नाही, असे होत असे तर निश्चित कारवाई करू, असे वैजापूरचे तहसीलदार राहूल गायकवाड यांनी सांगितले.

या गोदा पट्टयातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली गोदावरी नदीतुन मागील अनेक वर्षापासून सर्रासपणे बेकायदा वाळू वाहतुक व्यवसाय शहरातील दादा, भाई अशाच्या प्रत्येक गावात ठरलेल्या पाँईट वरून वाळू वाहतुक चालायची, यामध्ये ज्यांची शेती नदीलगत आहे, अशा शेतकऱ्याला आठवड्याला ठराविक मलिदा देऊन बिनधास्तपणे प्रशासनाच्या आशिर्वादाने वर्षातील जवळपास ४ ते ५ महिने वाळू व्यवसाय फोफावला होता.

मात्र मागील पंधरवाड्यापूर्वी तेव्हापासुन वाळूतस्करा मध्ये मार्च एन्डची भिती निर्माण झाल्याने अनेकांनी वाळू व्यवसाय थांबविला होता. पण सध्या स्थितीत बाभूळगाव गंगा येथुन पुन्हा नव्या जोमाने हळूहळू अवैध वाळू व्यवसाय सुरु झाला असुन रात्रभर भयानक स्पीडने चालणाऱ्या गाड्यामुळे रस्त्या लगत राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन नुकतेच करण्यात आलेले रस्ते पुन्हा उखडण्याची भिती निर्माण झाली आहे. गोदाकाठील काही तरुणानी चौफुलीतुन वाळू वाहतुक होऊ न देण्याचा निर्णय घेतल्याने तस्कर पर्यायी इतर रस्त्याचा वापर करत असल्याचे समजते.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकानी लक्ष घालण्याची मागणी

गोदावरी पट्टयातुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून यामध्ये शहरातील अनेक टोळ्यांचा समावेश आहे. सांयकाळी ५ ते ६ च्या दरम्यान सुरु होणारी अवैध वाळू वाहतुक कोणाच्या आशिर्वादाने सुरु असते हे न समजण्या पलीकडील कोडे आहे. अवैध व्यवसायामुळे या भागातील अनेक रस्त्यांची चाळणी झाली असुन तरुण व्यसनाधिन बनले आहे. सध्याचे लहान-लहान वाळू पटंराची मुजोरी देखील वाढली आहे. त्यामुळे याप्रश्नी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यानीच लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ, शेतकरी यांच्याकडून होत आहे. विशेष बाब म्हणजे वैजापूर तालुक्यातून वाळूची ही तस्करी औरंगाबादमधील तसेच अहमदनगर जिल्ह्यातही वाळूची मागणी पूर्ण करत आहे. सदरील अवैधरीत्या सुरू असलेल्या वाळूच्या उपसावर कोण लगाम लावेन?प्रशासन या बेसुमार अवैध वाळूच्या चोरीवर पूर्णविराम लावेल का याबाबत शंका उपलब्ध होत आहे.

दि.१० रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लाखनी हद्दीतील शिवना नदीपात्रातून एक विना क्रमांक JCB व हायवा मध्ये वाळू भरत असताना तहसीलदार राहुल गायकवाड हे आपल्या पथकासह कारवाईसाठी गेले असता त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून JCB चालकाने तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यावर दातरी बकेट वारंवार फिरवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

Related Stories

No stories found.