अवैध वाळू उपशावर एलसीबीचा छापा

काशी नदीपात्रात कारवाई: दोघांवर गुन्हा
अवैध वाळू उपशावर एलसीबीचा छापा
संग्रहित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. कारवाई दरम्यान एक जण पसार झाला. अजय राजेंद्र घोरतळे (वय 22 रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर महेश राजेंद्र घोरतळे (रा. बोधेगाव) हा पसार झाला आहे. शेवगाव तालुक्यातील काशी नदीपात्रात ही कारवाई केली.

आरोपी विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टर- ट्रॉली व वाळू, असा पाच लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिवाजी ढाकणे, शंकर चौधरी, राहूल सोळंके, रणजीत जाधव, शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार भगवान बडधे, वासुदेव डमाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.