शेवगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा जोरात

करोनामुळे प्रशासन व्यस्त ; कारवाईकडे दुर्लक्ष
संग्रहित
संग्रहित

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) - तालुका प्रशासन करोना संकटकाळात नियोजनामध्ये व्यस्त असताना वाळू तस्करांकडून तालुक्यातील विविध नदी पात्रांमधुन वाळु उपसा करण्याचा उद्योग बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

विविध नदी पात्रातून वाळू उपसा सर्रास सुरू असून त्यामुळे नदी काठच्या भुगर्भातील पाणी पातळी खालवली आहे. सध्या कारवाई थंडावल्याने बेकायदा वाळू व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यातून गोदावरी, ढोरा, नंदिनी, काशी, रेडी, अवनी, सकुळा या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांसह त्यांना मिळणार्‍या उपनद्या, ओढे- नाल्यांनी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र व्यापले आहे.

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने या नद्यांसह ओढ्या नाल्यांनी त्या परिसरातील शेती व गावांना हिरवी समृध्दी आणली. मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहुन आलेल्या शुभ्र वाळूवर अशुभ नजर पडलेली आहे. या नद्या व ओढ्यांमधून रात्री वाळू उपशाचा हा खेळ चालु आहे. गोदावरीच्या नावाखाली तालुक्यातील इतर नद्यांची वाळू ही धुवून चढ्या भावात ग्राहकांच्या विकली जाते. वर्षभर अशा गौण खनिजाचा अवैध उपसा सुरु राहिल्याने त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com