बेशिस्त पार्किंग करणार्‍यांना आयुक्तांचा दणका

दुचाकींची हवा सोडून केली कारवाई
बेशिस्त पार्किंग करणार्‍यांना आयुक्तांचा दणका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका मुख्यालयाच्या आवारात बेशिस्तपणे दुचाकी वाहने लावणार्‍या वाहन चालकांना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी दणका दिला. आवारात नियुक्तीला असलेल्या कर्मचार्‍यांना फैलावर घेतले. आयुक्तांच्या आदेशानुसार पार्किंग व्यतिरिक्त इतरत्र लावलेल्या दुचाकींची हवा सोडण्यात आली. त्यामुळे नागरिकांसह मनपा कर्मचारी व नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनाही दुचाकीला धक्का मारण्याची वेळ आली.

बुधवारी सकाळी आयुक्त डॉ. जावळे हे महापालिकेत आले असता, प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच दुचाकी लावलेल्या आढळून आल्या. बेशिस्तपणे लावलेल्या या दुचाकींमुळे अधिकारी, पदाधिकार्‍यांची वाहने आत नेण्यास अडथळा निर्माण झाला होता. दुचाकी वाहने लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

रस्त्यात दुचाकी लावण्यात येऊ नयेत, अशी सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला आहे. असे असतानाही अस्ताव्यस्त दुचाकी लावण्यात आल्याने आयुक्त डॉ. जावळे यांनी आधी मनपाच्या तेथे नियुक्त असलेल्या कर्मचार्‍यांना जाब विचारत फैलावर घेतले. त्यानंतर इतर सर्व शिपाई कर्मचार्‍यांना बोलावून घेत इतरत्र लावलेल्या दुचाकींची हवा सोडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आयुक्त जावळे स्वतः हवा सोडेपयर्र्ंत आवारात तळ ठोकून उभे होते.

दरम्यान, आयुक्तांच्या या कारवाईची माहिती कार्यालयात पसरताच अनेकांनी दुचाकी काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अनेक दुचाक्यांची हवा सोडण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com