जामखेडमध्ये अवैध सावकारांचे धाबे दणाणले; आणखी एक गुन्हा दाखल

दोन दिवसात दुसरा गुन्हा
जामखेडमध्ये अवैध सावकारांचे धाबे दणाणले; आणखी एक गुन्हा दाखल

जामखेड | तालुका प्रतिनिधी

खासगी सावकाराकडू घेतलेले व्याजाचे पैसे परत मागत असुन तसेच वेळोवेळी व्याज देऊन तसेच व्याजाच्या पैशात जबरदस्तीने टि. व्ही घेऊनही खाजगी सावकाराचा त्रास थांबत नसल्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐकाने खाजगी सावकाराच्या विरूद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसातील सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्याने सावकारांचे धाबे दणाणले असुन जामखेड पोलीसांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, आरोपी दिपक अशोक चव्हाण याने १ लाख ३० हजार रुपये जामखेड शहरातील रसाळनगर येथील गणेश अभिमान भानवसे यांना दर महीना ४० टक्के व्याजाने देवून, फिर्यादीकडून बँकेचे चार चेक हमीपोटी घेवून, दिलेल्या पैश्याचे व्याजाचे व हफ्ते चे रोख रक्कम समक्ष व मोबाईल वरील फोन पे या अँप्लिकेशन द्वारे घेतले. तसेच दिपक चव्हाण याने गणेश भानवसे यास धमकी देऊन, बळजबरीने त्यास टी.व्ही.चे दुकानात घेवून जावून, व्याजापोटी ४६,९९०/- रु किंमतीचा एलसीडी टी.व्ही. घेतला व सदरचा टी. व्ही. दिलेचे कोणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम दिला.

तसेच त्यानंतर ही पैश्याचे व्याज दे असे म्हणून दि. १५/0९/२०२१ रोजी पैश्याचे व्याज फिर्यादीचे मोबाईल द्वारे या नंबरवरील फोन पे अँप्लीकेशन द्वारे आरोपीकडील मोबाईल द्वारे या नंबर वरील फोन पे अँप्लीकेशन द्वारे घेतले आहे. तसेच दि. २३/0९/२०२१ रोजी दिपक चव्हाण याने गणेश भानोसे हा त्याचे घरी नसताना त्याचे घरात बळजबरीने घूसून मोठमोठ्याने शिवीगाळ करून गणेशच्या पत्नीस म्हणाला की, तुझा पती कोठे गेला. त्याला माझे पैसे व त्या पैश्यावरील व्याज द्यायला सांग, नाही तर मी त्यास जिवे मारीत असतो अशी धमकी व शिवीगाळ केली. यानुसार गणेश अभिमान भानवसे वय 34 वर्ष रा. रसाळनगर, नगर रोड, जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिपक अशोक चव्हाण रा. धर्मयोद्धा चौक, तपनेश्वर रोड, जामखेड याचे विरोधात भा.द.वि.क. ३८७, ३८४, ४५२, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दि. २२/७/२०२१ रोजी २:३० वाजेच्या सुमारास व तसेच दि. २३/९/२०२१ रोजी ७ : ०० वाजताचे दरम्यान वेळोवेळी घडला असून दि. २६/९/२०१२ रोजी १:१४ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.

या घटनेमुळे जामखेड तालुक्यात खाजगी सावकारकीच्या विरूद्ध दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. यावरून जामखेड तालुक्यात खाजगी सावकारकीचे जाळेच असल्याचे दिसत आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सावकारकीच्या विरूद्ध हाती घेतलेल्या मोहिमेमुळे अनेकांचे संसार सावकाच्या अत्याचारतून सुटून उभे राहात आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com