अवैध सावकारीच्या 557 तक्रारीत तथ्यच आढळले नाहीत!

14 तक्रारीत गुन्हे दाखल, 17 आरोपींचा समावेश
अवैध सावकारीच्या 557 तक्रारीत तथ्यच आढळले नाहीत!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध सावकारीच्या 661 तक्रारी जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या होत्या. मात्र, सहकार विभागाने केलेल्या तपासणीत 557 तथ्य आढळलेले नाहीत. उर्वरितामध्ये 23 लोक अधिकृत सावकारीचा परवाना नसतांना सावकारीत करत होते. यातील 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.

राज्यात तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात अवैध खासगी सावकारी कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 नूसार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे 661 अवैध खासगी सावकारीच्या तक्रारी आल्या होत्या. आलेल्या तक्रारींची पडताळणी केली असता यातील 557 तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे समोर आले. यामुळे अवैध सावकारीच्या या तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तर 14 नूसार गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 17 आरोपी विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्हा उपनिबंधक विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.

133 अधिकृत सावकार

जिल्ह्यात अवैध खासगी सावकारी कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कायदा अस्तित्वात आल्यापासून 124 जणांनी अधिकृतपणे सावकारीचा परवाना घेतलेला आहे. ही आकडेवारी 2021-22 पर्यंत असून 2022-23 मध्ये नव्याने 16 जणांनी सावकारीच्या परवान्यांसाठी अर्ज केला असून 117 जणांच्या परवान्यांचे नुतणीकरणासाठी अर्ज आहेत. जानेवारी 2023 अखेर जिल्ह्यात एकूण 133 अधिकृत खासगी सावकार असून दुसरीकडे चौघांनी परवाना नुतणीकरण केलेले नाहीत. तर वेगवेगळ्या कारणामुळे तिघांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com