File Photo
File Photo
सार्वमत

बेकायदा गौणखनिज वाहतुकीची पकडलेली वाहने सोडून देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा

जिल्हाधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्त्याची मागणी

Arvind Arkhade

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

तहसिलदार व पोलिसांनी नेवासा तालुक्यातील बेकायदा गौणखनिज वाहतूक करताना पकडलेली जवळ्पास 79 वाहने सोडून देणार्‍या संबंधीत महसूल अधिकरी व कर्मचारी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडे केली आहे.

तक्रार अर्जात श्री.गायके यांनी म्हटले की, माहिती अधिकार अंतर्गत दि. 30 जुलै 2020 रोजी सन 2018 ते 2020 नेवासा तहसिलदार यांचे तसेच पोलीस स्टेशन यांचे मार्फत नेवासा तालुक्यातील बेकायदा गौणखनिज वाहतूक करतांना पकडण्यात आलेली वाहने एसटी आगार प्रमुख नेवासा यांचे कार्यालय आवारामध्ये जमा करत असे.

यामध्ये एकूण वाहने जवळपास 79 च्या आसपास असल्याचे माहितीवरुन दिसून येत आहे. सदर वाहने ही दंड न घेता सोडून देण्यात आलेली दिसून येत आहे. तहसिल कार्यालयाने वाहनांचा दंड व कारवाई करण्यासाठी नोटीस काढली असून बहुतांश वाहनांनी नोटीसा काढूनही दंड भरलेला नाही. तसेच अनेक वाहने ही दंड न भरताही सोडून देण्यात आली आहेत.

वाहनांचे मालकांना सुमारे 80 लाख 99 हजार 30 रुपये दंड भरण्याच्या नोटिसा बजविल्या होत्या.परंतु त्यापैकी काही व्यक्तींकडून केवळ 27 लाख रुपयेच दंड वसुल झाला आहे तर उर्वरित व्यक्तींनी एक पैसा ही दंड न भरता त्यांची वाहने सोडून दिल्याने सुमारे 53 लाख 99 हजार 30 रुपयांची दंड वसुली बाकी आहे.

दंड न भरता राज्यपाल यांचे गौण खनिजांचे अधिनियमांचे उल्लंघन करुन वाहने ही सोडण्यात आली आहे. सदर प्रकरणी महसूल अधिकारी व त्यांचे कर्मचारी दोषी असून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल असे म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com