अवैध दारू अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा दाखल

File Photo
File Photo

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहर आणि परिसरात अवैध व्यावसायिकांवर धाडसत्र सुरू केले असून मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत मनाई वस्ती येथे गावठी दारू पाडणार्‍या अवैध व्यावसायिकांवर त्यांनी कडक कारवाई केली असून त्यात साहेबराव नाना सोनवणे व नानासाहेब कारभारी गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

संवत्सर हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रालगत मनाई वस्ती काटवन येथे साहेबराव नाना सोनवणे (वय 47) याने गावठी दारू बनविण्याचा उद्योग सुरू केला होता. त्याची खबर पोलिसांना गुप्त खबर्‍या मार्फत मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या धाडीत 25 हजार रुपयांचा गावठी हातभट्टीसाठी लागणारा कच्चा माल, आंबट रसायन, फायबरच्या टिपाडात सुमारे 2 हजार 500 लिटर इतके कच्चे रसायन आढळून आले आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.

दुसर्‍या घटनेत याच नदीकाठी दुसरा आरोपी नानासाहेब कारभारी गायकवाड यानेही मनाई वस्ती याठिकाणी काटवनात आपला गोरख धंदा सुरू ठेवला होता. त्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत सुमारे 25 हजार रुपये किंमतीचा अवैध दारू निर्माण करण्याचा आंबट उग्रवास असलेला टिपाडात भरलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पो. कॉ. संभाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. क्रं. 390, 389/2022 महाराष्ट्र प्रोव्हीजन अ‍ॅक्ट 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो. हे. कॉ. आर. पी. पुंड करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com