संगमनेरात बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा

प्रतिष्ठित कुटुंबातील आठ तरुणांसह पार्लर चालकांविरुद्ध गुन्हा
File Photo
File Photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरातील एका हॉटेल जवळील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लर वर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. या हुक्का पार्लरमध्ये शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील आठ तरुण हुक्का पिताना आढळले. पोलिसांनी या तरुणांसह पार्लर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहर व परिसरात बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. अहमदनगर येथील पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी परिसरातील हॉटेल ग्रीन लिप शेजारी असलेल्या पत्र्याचे शेडचे आडोशाला सुरू असलेल्या हुक्का पार्लर वर छापा टाकला. या पार्लरमध्ये अनेकजण हुक्का पिताना आढळले.

पोलिसांनी आठ तरूणांसह हुक्का पार्लर चालकास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या युवकांना पोलीस ठाण्यात आणण्याचे समजताच अनेक मान्यवरांनी शहर पोलीस ठाण्यात रात्री गर्दी केली होती. या मुलांवर कारवाई करू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र नगरच्या पोलिसांनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून कारवाई केली.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शंकर चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी संकेत नारायण कलंत्री (वय 36 रा बाजारपेठ , गणेश शिवप्रसाद लाहोटी (वय, 35 रा शिवाजी नगर संगमनेर), श्रेयस श्रीकांत मनियार (वय 36, रा स्वातंत्र चौक), ऋषी संतोष आव्हाड (वय 24 रा. शिवाजीनगर), अनिकेत चंद्रकांत खोजे (वय 22 रा. गणेश नगर), जयनेश धरमेद्र शहा (वय 28 28 वर्षे रा बाजारपेठ), सागर मोहन पंजाबी (वय 30 रा विद्यानगर), प्रसाद मयय्या गुंडेला (वय 31 रा इंदिरानगर), संतोष अशोक वांढेकर (वय 34 रा लक्ष्मीनगर गुंजाळवाडी) या नऊ जणांविरुद्ध गु.र.नं .971/2022 सिगारेट व तंबाखु उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंद आणि व्यापारी व वाणिज व्यवहार उत्पादन व पुरवठा व वितरण विनिमय) अधिनियन 2003 चे सुधारीत अधिनिय मी 2018 कलम 4 व 21 (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस नाईक उगले हे करीत आहे.

पोलिसांनी या कारवाईमध्ये हुक्का पिण्यासाठी लागणारे 55 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. यामध्ये 27 हजार रुपये किमतीचे हुक्का पिण्यासाठी लागणारे काचेचे व स्टीलचे साहित्य, 2600 रुपये किमतीचे हुक्का पिण्यासाठी लागणारे, 13 रबरी पाईप 250 रुपयांचा काळ्या रंगाचा अर्धवट जळालेला कांडी कोळसा, 2 हजार रुपये किमतीचे सिनेचर फ्लेवरचे केमिकल आदी साहित्याचा समावेश आहे.

एलसीबीची कारवाई संशयास्पद..

अहमदनगर येथील एलसीबीच्या पथकाने केलेली ही कारवाई संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी जे शेड दाखवले आहे ते शेड त्या ठिकाणी अस्तित्वातच नाही. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही कारवाई करण्यास सांगितल्याचा दावा एलसीबीचे काही कर्मचारी करत होते. एसपींकडे याबाबतचा व्हिडिओ आला असल्याचे त्यांचे म्हणणे होते प्रत्यक्षात मात्र एलसीबीने ही कारवाई परस्पर केल्याची माहिती उपलब्ध झाली यामुळे एलसीबीचा हा छापा संशयाच्या भोवर्‍यामध्ये अडकला आहे. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू नये अशी विनंती अनेक प्रतिष्ठित करताना दिसत होते मात्र संबंधित कर्मचार्‍यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com