अवैध गॅस भरताना पोलिसांचा छापा

कर्जुले हर्या येथे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध गॅस भरताना पोलिसांचा छापा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर कर्जुले हर्या येथे हरेश्वर वॉशिंग सेंटर याठिकाणी पारनेर गणेश गॅस एजन्सी या गाडीतून अवैधपणे टाक्यामधून मारुती व्हॅनमध्ये गॅस रिफलिंग करताना पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांनी छापा टाकला. याप्रकरणी 7 लाख 86 हजार 900 रुपयांचा मुद्येेमाल जप्त करण्यात आला. असून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव पोपट साळुंखे (26), सुनील सुरेश आंधळे (23, दोघे रा. कर्जुले हर्या), अक्षय भाऊसाहेब सोनवणे, मिनीनाथ भगवान चत्तर एजन्सी चालक अजय पतके (तिघे रा. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पारनेर येथील भारत गॅसच्या गणेश गॅस एजन्सीच्या टेम्पो क्रमांक (एम एच 12 आर एन 8104) मधून गॅस टाकी उतरून अवैधरित्या इलेक्ट्रिक पंपच्या सहाय्याने ओमिनी क्रमांक (एम. एच 16 एटी 1602) मध्ये गॅस रिफलिंग करताना आढळून आले.

त्यामुळे चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत इलेक्ट्रिक मोटार व रेग्युलेटर व दोन्ही बाजूला असलेले साहित्य 2 लाख रुपये किमतीची मारुती व्हॅन, 5 लाख रुपये किमतीची गॅस सिलिंडर वाहणारी 407 पिकअप, 52 गॅस सिलेंडर ज्यामध्ये रिकामी 38 व भरलेले 14 असा एकूण 7 लाख 86 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंबंधीची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर काशिनाथ लोंढे यांनी दिली असून संशयित 5 जणांवर जीवनावश्यक वस्तू कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com