
राहुरी |ता. प्रतिनिधी| Rahuri
राहुरी (Rahuri) येथील बारागाव नांदूर रोडलगत (Baragav Nandur Road) गोदामात टाकण्यात आलेल्या छाप्यात (Warehouse Raid) एकूण 33 लाख 7 हजार रुपये किंमतीची ड्रग्जसदृश अंमली पदार्थ व औषध राहुरी पोलिसांनी (Rahuri Police) हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक (Arrested) करून गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला असून पोलीसांचा कारवाईचा सुगावा लागताच तिसरा आरोपी (Accused) पसार झाला आहे.
औषध निरीक्षक अन्न व प्रशासन अहमदनगर (Drug Inspector Food and Administration Ahmednagar) येथील ज्ञानेश्वर दरंदले यांनी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास पोलिसांनी एका गोदामावर धाड टाकून ही कारवाई केली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बारागाव नांदूर रोडलगतच्या तीन गाळ्यांमध्ये हा बेकायदा औषध साठा आढळून आला. राहुरी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा या बेकायदा साठ्याची मोजणी करून जमीर मेहबूब शेख (वय 22 रा. जुना कनगर रोड राहुरी) व अख्तर चांद शेख (वय 21 रा. मल्हारवाडी रोड राहुरी) या दोन जणांना अटक केली असुन त्यांच्या गुन्हा दाखल केला आहे. तर तिसरा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.