अवैध देशी व विदेशी दारू साठ्यावर राजूर पोलिसांची कारवाई

अवैध देशी व विदेशी दारू साठ्यावर राजूर पोलिसांची कारवाई

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुक्यातील केळुंगण येथे अवैध देशी व विदेशी दारु अड्ड्यावर राजूर पोलिसांनी छापा टाकून 69 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

केळुंगण, ता. अकोले येथील नवनाथ सुरेश देशमुख हा चोरुन देशी व विदेशी दारुची विक्री करत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली राजूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केळुंगण गावात नवनाथ सुरेश देशमुख याचे घराजवळील पत्र्याच्या शेडजवळील दारु अड्ड्यावर छापा टाकला.

सदर ठिकाणची झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील प्रमाणे देशी व विदेशी दारुचा 69 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गाढे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी नवनाथ सुरेश देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले) याच्या विरुद्ध राजुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. 102/2022 मुंबई दारु बंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भडकवाड करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com