गायकवाड यांच्यासमोर अवैधधंदे रोखण्याचे आव्हान

गायकवाड यांच्यासमोर अवैधधंदे रोखण्याचे आव्हान

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता पोलीस स्टेशनमध्ये (Rahata Police Station) नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड (Police Inspector Sunil Gaikwad) यांच्यासमोर पुणतांबा (Puntamba) परिसरातील गुन्हेगारी व अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान (The big challenge of closing down illegal businesses) आहे.

राहाता पोलीस स्टेशन (Rahata Police Station) अंतर्गत पुणतांबा (Puntamba) येथे आऊट पोस्ट (out Post) आहे. या औटपोस्टला पोलिसांची संख्या कमी आहेच व जे आहेत त्यापैकी काही बाहेर गावाहून ये-जा करतात. तालुक्यात हे गाव अत्यंत संवदेनशील समजले जाते. पुणतांबा पोलीस स्टेशन (Puntamba Police Station) अंतर्गत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना पाच ते सहा गावातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असते. तसेच महत्वाच्या कामाकरिता नेहमी राहात्याला जावे लागते. कारण गुन्ह्याची नोंद राहात्यालाच करावी लागते. त्यामुळे पोलिसावर कामाचा ज्यादा ताण असतोच.

परिसरात सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांनी चांगलाच जम बसविलेला आहे. त्यांच्यावर नियत्रंण ठेवण्याची महत्वाची जबाबदारी नवीन पोलीस निरीक्षकांवर आहे. विशेष म्हणजे पुणतांबा परिसरात अधूनमधून चोरीच्या घटना घडत असतात. आतापर्यंत एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये अगोदरच पोलिसांबद्दल नाराजीचे वातावरण आहे. श्री. गायकवाड (Police Inspector Sunil Gaikwad) यांनी मागील आठवड्यात गणेश उत्सवाच्या निमित्ताने पुणतांबा येथे येऊन ग्रामस्थांसमवेत शांतता समितीची बैठक घेतली. असे असले तरी पुणतांबा परिसरातील गुंडगिरी तसेच अवैध धंद्याबाबत (Illegal business) पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड (Police Inspector Sunil Gaikwad) कसा बंदोबस्त करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com