सोनई पोलिसांची अवैध दारू व मटका अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई

File Photo
File Photo

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोरेचिंचोरे, पानसवाडी, खोसपुरी, पानेगाव येथील बेकायदा दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर सोनई पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोरेचिंचोरे येथील नदीच्या पुलाजवळील टपरीच्या आडोशाला गोरख अशोक माळी (वय 24) हा पानसवाडी शिवारातील महेश हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडजवळून बापू कोंडीराम गिर्‍हे (वय 48) रा. पानसवाडी तर वांजोळी शिवारातून खोसपुरी फाट्याजवळ संतोष भाऊसाहेब कदम रा. खोसपुरी, पानेगाव येथील हॉटेल परिवारच्या पाठीमागील पत्र्याच्या आडोशाजवळ चंद्रकांत हौशीराम जंगले (वय 50) रा. पानेगाव ता. नेवासा हे विनापरवाना बेकायदा दारू विक्री करत असल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई केली.

पांढरीपूल वांजोळी शिवारातील खोसपुरी फाट्याजवळ शाम सुमंत भालेराव रा. खोसपुरी हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या पद्मावती मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना व खेळवताना मिळून आला पण पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेल्याने महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ता गावडे, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस नाईक विशाल थोरात हे पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com